बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात २ जानेवारी २०२६ रोजी झाली. यामध्ये पहिल्या दिवशी खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात कल्पना देविदास भानगुडे यांनी मानाची पैठणी व सोन्याची नथ जिंकली. तर मानाची पैठणी व कुलर हे द्वितीय बक्षीस कार्तिकी योगेश जाधव यांनी तर मानाची पैठणी व मिक्सर हे तृतीय बक्षीस दिपाली अंकुश घुले यांनी जिंकले. तसेच यावेळी खास ३१ लोटस पैठणी महिलांना बक्षीस स्वरुपात देण्यात आल्या.
कार्यक्रम संपल्यानंतर महिलांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी गावातील अनेक देणगीदार, व्यावसायिक, सरपंच विजयाताई पटेकर, उपसरपंच अनिलदादा घुले, चेअरमन आबासाहेब पालवे, व्हा. चेअरमन बेबीताई कोकाटे, कडूचंद कोकाटे गुरुजी, शिरुभाऊ लोंढे, मा. व्हा.चेअरमन जबाजी आण्णा पांढरे, त्रिंबकराव दारकुंडे, मुरलीधर रुपनर, बबनराव भुजबळ, बाळासाहेब भानगुडे, सुभाषराव घुले, भीमराज लोंढे, सुरेशराव तवार, दिगंबर फलके, माजी सरपंच ज्ञानदेव पागिरे,
(छायाचित्रकार- शिवा फोटोग्राफी) माजी सरपंच दिगंबर शिंदे, महादेव भानगुडे, अशोक पाटील वाघमोडे, सुनील आण्णा शिंदे, डाॅ. बाळासाहेब शिंदे, संजय खेडकर, माजी चेअरमन संजय गाडे, माजी चेअरमन डाॅ. रघुनाथ पागिरे, मल्हारी आखाडे, रामभाऊ बाचकर, जगन्नाथ धनवटे, भाऊसाहेब शिरसाट, शहादेव लोंढे, शिवसेना संघटक गोकुळ लोंढे, मच्छिंद्र लोंढे, बाबासाहेब थोरात, दिपकराव आखाडे, अमोल पालवे, शंकरराव गुलगे, संजय आखाडे, ज्ञानदेव सानप, सोपान घुले, शिवहरी अष्टेकर, सकाहरी शिंदे, कानिफ डोमकावळे आदी ग्रामस्थ, सर्व सदस्य व सर्व संचालक विशेष परिश्रम घेत आहेत.


