श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या देडगाव शाखेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनातून देडगाव शाखेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासच्या संचालिका मीनाक्षी मुंगसे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी त्यांनी प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली. यावेळी कावेरी मुंगसे, मीरा नांगरे, प्रतिभा नांगरे, संध्याताई तोडकर, अश्विनी नांगरे, सुमन सांगळे, लताबाई नांगरे, शकुंतला अंबाडे, सुमनबाई क्षिरसागर, शुभम कुटे, सतीश वाकडे, भाऊसाहेब मुंगसे, सभासद, खातेदार, कर्जदार, कॅशियर अक्षय तिडके, क्लर्क योगेश भारती उपस्थित होते. शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.