शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेत चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल १०० टक्के

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- शासकीय महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय रेखाकला परीक्षेत चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल सलाबतपूर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेत कु. गायत्री गणेश काळे, कु. पूजा नारायण कोहक, राजवीर सतीश कर्डीले, सोहम रमेश गवळी, वैभव बाळासाहेब चावरे, वेदांत गणेश साळुंखे, कु.विद्या महादेव गोरे यांनी तर इंटरमिजीएट परीक्षेत कु. पलक श्रीकृष्ण कुऱ्हाडे, कु. तमन्ना समीर पठाण यांनी घवघवीत यश मिळवले.व स्कूल ची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.सदर दोन्ही परीक्षेचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला असल्याची माहिती स्कूल चे प्राचार्य रविंद्र गावडे यांनी दिली. सदर विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.