श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी देडगाव शाखेत इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक शाखाधिकारी यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली व स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, मुरलीधर दहातोंडे, सागर बनसोडे, सुरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युनुसभाई पठाण, पावन गणपती देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, नवनाथ रक्ताटे, रामचंद्र कदम, शंकर सोनवणे, अजित तांबे, गणेश लाडके, शिवम कुटे तसेच संस्थेचे रिजनल ऑफिसर देविदास कदम, अशीश शिंदे, शाखाधिकारी पांडुरंग एडके, अभिषेक राऊत, राहुल मुंगसे, अक्षय तिडके तसेच सभासद व खातेदार उपस्थित होते. शाखाधिकारी एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.