महालक्ष्मी हिवरे येथील नारळी सप्ताहास नामदार आशिष शेलार यांची सदिच्छा भेट

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील संत नारायणबाबा तारकेश्वर गड येथे हभप अदिनाथ महाराज शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ४७ व्या नारळी सप्ताहनिमित्त बुधवारी (ता.२) गणेश महाराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मोगरा फुलला या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक मंञी नामदार आशिष शेलार साहेब, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,आमदार सत्यजित तांबे, आमदार विलास लांडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, भाजपाचे युवानेते ऋषिकेश शेटे, सरपंच अनिल घुले, सचिन दुसूंगे, दत्ताञय तापकिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी देवस्थानच्यावतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तर राज्याचे सांस्कृतिक मंञी अशिष शेलार यांचा सत्कार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केला. यावेळी विविध मान्यवर भाविक -भक्त आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.