बालाजी देडगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास रविवार (दि.६) पासून सुरुवात होत आहे. येथील हनुमान मंदिर प्रांगणात होणाऱ्या या सप्ताहकाळात पहाटे ४ ते ६ काकडा, ९ ते ११ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण, ११ ते १ भोजन, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व ७ ते ७ या वेळेत हरी किर्तन व त्यानंतर महाप्रसाद या दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहकाळात हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप अमोल महाराज सातपुते, हभप ईश्वर महाराज शास्त्री, राष्ट्रीय धर्माचार्य हभप जनार्धन महाराज मेटे, रामायणाचार्य हभप सोमेश्वर महाराज गवळी, रामायणाचार्य हभप लक्ष्मण महाराज शास्त्री, भागवताचार्य हभप योगेश महाराज जाधव यांची किर्तनसेवा होणार आहे. रविवारी (दि.१३) हभप गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी ( श्री ज्ञानेश योग आश्रम संस्था, डोंगरगण) यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी बजरंग दल, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ बालाजी देडगाव विशेष परिश्रम घेत आहेत.