जेऊर हैबती येथील पारायण सोहळ्यात आज उद्धव महाराजांची किर्तनसेवा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज बुधवारी (ता.१६) हभप उद्धव महाराज सबलस यांची किर्तन सेवा होणार आहेत तर आज बुधवारी (दि.१६) दुपारी ११ वाजता वै. मारूतराव म्हस्के पाटील यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्ताने अण्णासाहेब म्हस्के (आबा) यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदानाची पंगत आयोजित करण्यात आली आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त म्हस्के पाटील परिवाराने केले आहे.
या सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि.१४) हभप कृष्णाजी महाराज ताठे (चितळी) यांच्या किर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनसाठी जेऊर हैबती व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हभप कृष्णाजी महाराज ताठे यांच्या किर्तनादरम्यान भाविक मंत्रमुग्ध होत परिसर भक्तिमय झाल्याचे बघायला मिळाले.यावेळी आण्णासाहेब म्हस्के (आबा), हभप कैलास महाराज रिंधे, बबन ईटकर, कचरु मामा ताबे, रंगनाथ उगले, भगवान गहाळ, डिगुनाना धनवटे, भाऊसाहेब भुजबळ, सुदाम उगले, भगवान गवारे, गुलाबराव उगले, परमेश्वर उगले, बलराम शंकर रिंधे, नंदुकाका उगले, कृष्णा महाराज उगले ,  महेश भैय्या उगले, मंगेश उगले, अंबादास खराडे साहेब, गौतम रिंधे (इंजीनिअर), रामराव मामा ताके, हरीभाऊ कपिले, बाळासाहेब रिंधे, आसाराम घुगरे, दत्तात्रय तांबे टेलर, राऊसाहेब दादा ऊगले, रामू मामा धनवटे, सोमा ईटकर, भास्कर गवारे , अचपळभाऊ जवादे ,भगवान मुरकुटे, सर्जेराव मामा ताके, बाप्पू मामा वाघमारे मिस्तरी, पांडुरंग देवा ताके, बाबासाहेब दादाबा ताके, डॉ. अशोकराव ताके, संदीप धनराज ताके, बापूसाहेब गवारे ( मा.उपसरपंच), सेवेकरी कचरु तांबे, संभाजी महाराज म्हस्के, विशाल उगले, बाप्पू मामा वाघमारे, डाॅक्टर तांबे, गोकुळ म्हस्के, भगवान मामा गहाळ, विठ्ठल मामा जावळे, संतकृपा मंडप & साऊंड सिस्टिमचे चौधरी दाजी, व्यासपीठ चालक हभप राऊसाहेब महाराज खराडे (बाबा), हभप देविदास महाराज म्हस्के, हभप महेश महाराज रिंधे, मृदुंगाचार्य योगेश महाराज शेजुळ (पिचडगाव) आदीं मान्यवर उपस्थित होते.