बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात मंगळवारी (ता.१५) हभप तुकाराम महाराज केसभट (वाघोली) यांची किर्तनसेवा पार पडली. यावेळी जेऊर हैबती व परिसर भक्तीमय झाला होता.
तर बुधवारी (दि.१६) दुपारी ११ वाजता वै. मारूतराव म्हस्के पाटील यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्ताने अण्णासाहेब म्हस्के (आबा) यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदानाची पंगत देण्यात आली.
यावेळी महेशराजे अण्णासाहेब म्हस्के (सरपंच), किसनराव मामा ताके, महादेव धायगुडे, शिवाजी रिंधे, भाऊसाहेब ताके, भास्कर उगले, संभाजी रिंधे, आप्पासाहेब बागडे, माऊली ताके, नारायण दत्तात्रय म्हस्के, एकनाथ खराडे, रामकिसन म्हस्के, गुगळे सर, राधाकिसन वाघ, पांडुरंग शिंदे, बाबासाहेब गोपीनाथ ताके, संपत ताके, घुगरे सर, साहेबराव काटे, दिलीप ताके, रघुनाथ ईटकर, बिरुदेव घुगरे, गंगाधर कदम (देडगाव), महेशराव खराडे, अंबादास म्हस्के, काकडे मामा, बबन जाधव, नवले मामा, प्रकाश उगले, गणेश शेटे, राधाकिसन बागडे, चंद्रभान ताके, वसंत लांघे, ज्ञानेश्वर म्हस्के (देवसडे) उपस्थित होते.
या पारायण सोहळ्यात महिला वाचक म्हणून शोभाताई नवनाथ रिंधे, भामाबाई भगवान गवारे, इंदुबाई जालिंदर तांबे, आराध्या दादासाहेब गवारे, मंगल बापूसाहेब वाघमारे, सुशीला कारभारी रिंधे, मंदाबाई बापूसाहेब उगले, मनीषा परमेश्वर उगले, अनिता श्रीरंग उगले, कुसुम घोरपडे, सुमन शिवाजी उगले, सुरेखा उगले, विमल घुगरे, निर्मला म्हस्के, मंगल उगले, पद्मा बडे, आदिती म्हस्के, शोभा म्हस्के, कमल शिवाजी ताके या सहभागी आहेत.
