बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी भानुदास कुटे, गोरक्षनाथ कुटे, लताबाई मोहन टाके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक तिजोरे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर लांघे सर यांनी आभार मानले.
