देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची पेढेतुला

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा आभार दौरा व महाशिवराञोत्सवानिमित्त महादेव मंदिर व बालाजी मंदिर येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दर्शन घेतले व गावकऱ्यांचे आभार मानले. यावेळी येथील युवा नेते निलेश कोकरे यांच्यावतीने आमदार लंघे पाटील यांची पेढेतुला करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची देडगाव येथे होणार पेढेतुला

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बालाजी देडगाव येथे पेढेतुला होणार आहे. येथील युवा नेते निलेश कोकरे व बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांच्या वतीने महादेव मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वप्रथम आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बसस्थानक ते महादेव मंदिर अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर महादेव […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ ते ११ या वेळेत येथील मारुती मंदिरासमोरील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पार्टीचे प्रमुख दत्तुभाऊ श्रीधर तिडके (गायक), सपना पुणेकर (गायक), स्नेहा […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ७ ते ११ शिवलिला अमृत ग्रंथाचे पारायण होणार आहे. यात्रेच्या दिवशी दुपारी १२ वाजता आमदार विठ्ठलराव लंघे पाटील भेट देणार असून यावेळी त्यांचा कैलासनाथ मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी ४ ते ७ […]

सविस्तर वाचा

ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांना नारळ वाढवून तेलकुडगाव येथील यात्रोत्सवाचा शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तेलकुडगाव येथील ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांना नारळ वाढवून पत्रिका पुजन करत यात्रोत्सवास शुभारंभ करण्यात आला. श्री क्षेत्र तेलकुडगांव येथे महाशिवरात्रीपासून २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी तीन दिवसीय ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी निमीत्त सभामंडपात नियोजन बैठक घेऊन चैतन्य नागनाथ महाराज चरणी नारळ वाढवून पत्रिका पुजन करून ग्रामदैवतांचा यात्रोत्सव […]

सविस्तर वाचा

चाईल्ड करिअर स्कूलचे स्नेहसंमेलन लक्षवेधी ठरणार

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे यावर्षीचे नवरंग कला महोत्सव 2025 लक्षवेधी ठरणार आहे . मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘रायरेश्वराची शपथ’ हे महानाट्य, घोडेस्वारी, एकास एक सदाबहार नृत्य ,पहाडी आवाजातील उत्कृष्ट निवेदन, बक्षिसांचा वर्षाव, बिग बॉस फेम छोटा पुढारी […]

सविस्तर वाचा

देडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांची सदिच्छा भेट

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कैलासनाथ मित्रमंडळ व देडगाव ग्रामस्थांच्या वतीने हभप भास्करगिरीजी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी भास्करगिरीजी महाराज यांनी महादेव मंदिर समोरील कामाची पाहणी केली. यावेळी हभप […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव ग्रामपंचायतकडून ९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2. महाआवास अभियान उपक्रम अंतर्गत तेलकुडगाव ग्रामपंचायत वतीने ९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, ग्रामविकास पंचायतराज विभाग यांचेकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2.” अंतर्गत महाआवास अभियान उपक्रम निमित्त विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित […]

सविस्तर वाचा

प्रधानमंत्री आवास योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा: सरपंच चंद्रकांत मुंगसे

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत देडगाव येथील ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून त्या लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम पूर्ण करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा दोन) अंतर्गत ग्रामपंचायत देडगावच्या वतीने ८८ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे धर्म ध्वजारोहणाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ धर्म ध्वजारोहणाने करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांच्या शुभहस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख मान्यवर म्हणून हभप सुखदेव महाराज मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष […]

सविस्तर वाचा