तांबे वस्ती येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती येथे सालाबादप्रमाणे संत सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य हभप मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. हा सप्ताह 38 वर्षापासून अखंड चालत आलेला असून याही वर्षी सप्ताहात नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडली. सांगता समारंभाच्या आदल्या दिवशी संत सावता महाराज यांच्या […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभामंडपाचे उद्या लोकार्पण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता महाराज मंदिर, तांबे वस्ती येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या ४० लक्ष रुपये किमतीच्या सभा मंडपाचे लोकार्पण उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या शुभहस्ते […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती येथील हरिनाम सप्ताहास प्रकाशानंदगिरी महाराजांची सदिच्छा भेट 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने श्री क्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सावता मंदिर देवस्थानच्या वतीने महाराजांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की, कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगावचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच शाश्वत विकास करण्याच्या संकल्पनेतून सतरा मुलभूत ध्येये आणि नऊ थीम्स, नवभारताच्या संकल्पनेवर भर देऊन तेलकुडगावच्या सर्व क्षेत्रात त्यामध्ये पायाभूत सुविधायुक्त गाव, सुशासन युक्त गाव, जलसमृध्द गाव, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव त्यामध्ये अंगणवाडी विभाग, शैक्षणिक क्षेत्र, पाणीपुरवठा विभाग, सामाजिक दृष्ट्या गाव सुरक्षित ठेवणे अशा […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगावचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच शाश्वत विकास करण्याच्या संकल्पनेतून सतरा मुलभूत ध्येये आणि नऊ थीम्स, नवभारताच्या संकल्पनेवर भर देऊन तेलकुडगावच्या सर्व क्षेत्रात त्यामध्ये पायाभूत सुविधायुक्त गाव, सुशासन युक्त गाव, जलसमृध्द गाव, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव त्यामध्ये अंगणवाडी विभाग, शैक्षणिक क्षेत्र, पाणीपुरवठा विभाग, सामाजिक दृष्ट्या गाव सुरक्षित ठेवणे अशा […]

सविस्तर वाचा

ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव गडाख साहेब यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक कार्यांचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती श्री संत रोहिदास ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी […]

सविस्तर वाचा

आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच: सुनिताताई गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- एक कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून ज्येष्ठ नागरिकांचा केलेला सन्मान व त्यानंतर मिळालेले आशिर्वाद हे माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाहीत, तसेच या “जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याच्या” निमित्ताने आपल्या सर्वांची सेवा करण्याची मला संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी केले.  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे शारदाताई फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शारदाताई फाउंडेशनच्या वतीने व महाराष्ट्र राज्याचे माजी मृद जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाने वृद्धांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. येथील बालाजी मंदिर सभागृहात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुखदेव महाराज मुंगसे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ काळे, युवा […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे उद्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या रविवारी (ता.२८) सकाळी ९ वाजता शारदाताई फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा (७० वर्षावरील वृद्धांचा सन्मान) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देडगाव परिसरातील वृद्धांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मृद जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व शारदाताई फाउंडेशनच्या नेवासा पंचायत समितीच्या माजी […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील राजा वीरभद्र (बिरोबा) देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी यात्रेच्या आदल्या दिवशी गंगेचे पाणी कावडीने आणून बिरोबा देवस्थानला स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी कबीरपंथी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. यात्रेच्या दिवशी सकाळपासून महाराष्ट्रातून भक्तगण दर्शनासाठी आले होते. या निमित्ताने […]

सविस्तर वाचा