ओंकार मुंगसे यांच्या यशाबद्दल नागेबाबा परिवाराकडून सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- केंद्रीय विद्यालय नंबर-2 एम आय आर सी अहमदनगर येथे बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ओंकार अंबादास मुंगसे याने दहावीच्या परीक्षेत 82.40 टक्के गुण मिळवले आहेत. ओंकार याने वर्गात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ओंकार मुंगसे याचा नागेबाबा परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, ओंकारचे आजोबा […]

सविस्तर वाचा

राजू वाघ यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कौठा येथील ग्रामपंचायत सदस्य राजू वाघ यांच्या वतीने राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेतराजे संभाजी माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. […]

सविस्तर वाचा

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी देडगाव शाखेत इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक शाखाधिकारी […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे जागतिक योगदिन उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना, नागरिकांनी, शारीरिक स्वास्थ्य संतुलित व समृद्ध राहील, आरोग्याची सुरक्षित काळजी घ्यावी, मन प्रसन्नता, अशा अनेक गोष्टींसाठी योगासने प्राणायाम करावी, हाच उद्देश योगदिनातून आहे. आंतरराष्ट्रीय योगदिवस निमित्त तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीडबाॅल्स उपक्रम

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी सीडबाॅल्स उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थी मित्रांनी मातीपासून सीडबाॅल्स तयार केले. यावेळी मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी या ग्लोबल वाॅर्मिंगच्या काळात वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा हे सीडबाॅल्सच्या माध्यमातून बालसंस्कार करण्यात आले. […]

सविस्तर वाचा

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या प्रमुखपदी देविदास महाराज म्हस्के 

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानचे प्रमुख म्हणून वारकरी संप्रदायातील निस्सीम सेवेकरी ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते व संत महंतांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. देवस्थानचे मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून सर्वांनी काम करावे, असे आवाहन भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले. वद्य एकादशीच्या मुहूर्तावर मंगळवारी […]

सविस्तर वाचा

भीषण अपघातात खरवंडी येथील एकजण जागीच ठार 

जनशक्ती, वृत्तसेवा- नेवासा तालुक्यातील खरवंडी येथून मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी नगरकडे जात असलेले खरवंडी येथील अनिल दगडू फाटके यांच्या दुचाकीचा डांबराची पिंपे घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या कंटेनरशी इमामपूर घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात अनिल फाटके यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आज (ता.१८) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा भीषण […]

सविस्तर वाचा

देवी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी भानुदास कुटे, गोरक्षनाथ कुटे, लताबाई मोहन टाके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक तिजोरे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. […]

सविस्तर वाचा

तांबे वस्ती शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, फुगे, टोपी देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील […]

सविस्तर वाचा

मुंगसे वस्ती (लाल गेट) शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती (लाल गेट) येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, […]

सविस्तर वाचा