बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व वै. कनकमलजी मुथ्था (काका) यांच्या कृपाशीर्वादाने श्री गणपती मंदिराचा भूमिपूजन समारंभ स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (उत्तराधिकारी, श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांच्या शुभहस्ते तर आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सागर अर्जुनराव सुसे, सागर सुसे, कडूभाऊ तांबे (माजी चेअरमन) सदाशिव महाराज पुंड, कुंडलिक दादा कदम, बाबासाहेब महाराज वांढेकर, लक्ष्मण महाराज लवांडे, पांडुरंग महाराज रक्ताटे, बाळासाहेब चोपडा, दत्ता पाटील मुंगसे (माजी सरपंच), सतीशशेठ मुथ्था, सुनीलशेठ मुथ्था, चंद्रकांत पाटील मुंगसे (सरपंच), बाबासाहेब मुंगसे (माजी चेअरमन), सोपानराव तांबे, सागर बनसोडे (चेअरमन), बाळासाहेब मुंगसे (उपसरपंच), जनार्दन भाऊराव मुंगसे (व्हा.चेअरमन), नवनाथ आसाराम मुंगसे (अध्यक्ष, बालाजी देवस्थान ट्रस्ट) पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार विष्णूभाऊ मुंगसे, सौ. वैष्णवी सागर सुसे, युवा नेते निलेश कोकरे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, गोकुळ वांढेकर, संभाजी काजळे, विठ्ठल काळे, खंडू कोकरे, बाळासाहेब कुटे, चांद पठाण पठाण,
पोपट मुंगसे, मेजर नरेश मुंगसे, चांगदेव तांबे आदी उपस्थित होते. यावेळी विशेष योगदानाबद्दल सागर सुसे, सौ. वैष्णवी सागर सुसे व सतीशशेठ मुथ्था यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ मुंगसे, विठ्ठल क्षिरसागर, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयकुमार लाड यांनी केले. सूत्रसंचालन संदीप नांगरे यांनी केले. तर आभार ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मानले.
