बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच नवगतांचे पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक करुन खाऊवाटप करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, दानियल दळवी, पोपट मुंगसे, आनंद दळवी, उत्तम सकट, प्रदिप मिरपगार, प्रकाश दळवी, प्रविण दळवी, अविनाश दळवी, अविनाश तांबे, येशूदास दळवी, ईश्वर भवार, गहिनीनाथ भवार, मयुर कोल्हे यांचे व पालकांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ व आभार सहशिक्षिका मनिषा कांबळे यांनी मानले.
