जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती येथे नवागतांचे उत्साहात स्वागत

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती येथे नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
मुंगसे वस्ती येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. नवागतांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना उपसरपंच बाळासाहेब मुंगसे यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश ,बुट वाटप करण्यात आले. तसेच मुलांना गोड स्नेहभोजन देण्यात आले. या कार्यक्रमासाठी बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक मुंगसे, उपाध्यक्ष अमोल सोनवणे, सदस्य देविदास मुंगसे, सदस्य, पालक, अंगणवाडी सेविका कुटे मॅडम, मदतनीस मुंगसे यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक पेहरे सर यांनी सुत्रसंचालन केले तर वाघ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.