बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र जेऊर हैबती ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे हभप वै. दत्तोबा महाराज रिंधे यांच्या आशिर्वादाने व चालक हभप सुभाष महाराज औटी यांच्या नेतृत्वात हभप विठ्ठल महाराज फलके, हभप हरिभाऊ महाराज तांबे यांच्या सहकार्याने आज जेऊर हैबती येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी दिंडीस निरोप देण्यासाठी हभप रमेशानंदगिरी महाराज (त्रिवेणीश्वर), ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा.डॉ. नारायणराव म्हस्के सर, कैलासराव म्हस्के (मा.चेअरमन, वि.का.स. सोसायटी), डॉ. भागवत, डॉ.नरवडे, पोलीस पाटील अजय रिंधे, माजी सरपंच संतोष म्हस्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी योग शिक्षक दिगंबर रिंधे, प्रा. नानासाहेब खराडे, प्रदिप ताके सर, कानडे सर, रामायणाचार्य हभप तांबे महाराज, प्रा. नारायणराव म्हस्के सर आदिंनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जेउर हैबती येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव रिंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले व दिंडीतील वारकऱ्यांना शरीर स्वास्थ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मोठ्या भक्तीभावात विठुनामाचा जयघोष करत दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.