नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – सुधीर पाटील

आपला जिल्हा

कुकाणा – महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना महसूल विभागाकडून राबवल्या जात असून गरजूसाठी अन्न सुरक्षा, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार, आवास योजना या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुधीर पाटील विभागीय अधिकारी अहिल्यानगर यांनी कुकाणा येथे कुकाणा मंडळ महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार डॉ. संजय बिरादार, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुराव काळे, सरपंच दिनकराव गर्जे, सरपंच लताताई अभंग, दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाने, भाऊसाहेब सावंत, सतीशराव कर्डीले, संदीप देशमुख, मच्छिंद्र कावरे, मच्छिंद्र आर्ले, हकीमाबी शेख, किरण शिंदे, मच्छिंद्र आर्ले, बाबासाहेब घुले, पोपराव सरोदे, किशोर मिसाळ, वैभव नवले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, गायरान जमिनीतील अतिक्रमन नियमित होतात. परंतु त्यातील अटीमुळे ती प्रकरणे प्रलंबित राहातात. पोट खराबा नोंद असलेली परंतु शेती लागवड योग्य  सर्व प्रकरणे महसूल विभागाकडून दुरुस्त करण्यांचे काम गतीने चालू असून सर्व अशा खातेदारांनी प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे सुधीर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच दिनकराव गर्जे, भाऊसाहेब सावंत, अंकुराव काळे, तहसीलदार डॉ. संजय बिराजदार यांनी मार्गर्शन केले. कार्यक्रमात पोट खराबा, लागवड योग्य प्रकरणे, आपत्ती पडझड मदत,महसूली, इतर दाखले, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी पुरवठा विभाग, लाभार्थी कोर्ट वाटप दरखास्त ताबा प्रकरण भेंडा बु. अशा पन्नासहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे चेक तसेच, दुरुस्त केलेले सातबारा उतारे, प्रमाणपत्र वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी कुकाणा मंडळ अधिकारी तृप्ती साळवे, ग्राममहसूल अधिकारी अभिजीत क्षीरसागर, प्रियंका चव्हाण, विजय काळे, बद्रीनाथ कामानदार, संजय भालेकर, राजेंद्र काळे, जॉय ओहळ, सुभाष महाशिकारे, सागर गायकवाड तसेच सेतू चालक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कचरे यांनी केले तर आभार मंडळ अधिकारी तृप्ती साळवे यांनी मानले.