आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मुलांना खाऊचे वाटप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सावंत सर यांनी केले. यावेळी सावंत सर म्हणाले, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, हा संदेश सावंत सर यांनी दिला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाचे मच्छिंद्र मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाचे मच्छिंद्र मुंगसे, युवक नेते निलेश कोकरे, भाजपचे आकाश चेडे, रवी काळे, अरुण वांढेकर, गंगाराम तांबे, गोकुळ वांढेकर, विठ्ठल काळे, मुख्याध्यापक सतीशकुमार भोसले सर, बथुवेल हिवाळे सर, धामणे सर, कदम मॅडम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.