बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त देडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत कृषी महाविद्यालय भानसहिवरेच्या कृषीदूतांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या अंगणात कृषी दिनानिमित्त एकूण सात झाडांचे वृक्षारोपण कृषिदुतांकडून करण्यात आले. कृषी महाविद्यालय भानसहिवरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरभटमट, गटाचे पथप्रदर्शक प्रो. मनोज माने व प्रो.संदीप सोनवणे हे या गटाचे मार्गदर्शक असून गटामध्ये कृषिदूत धनंजय आव्हाड, विशाल गागरे,अनिकेत धानापुणे, कुणाल उंडे, प्रशांत काळे, विशाल आव्हाड यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राचे महत्त्व, शाश्वत शेती पद्धती, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे फायदे, तसेच पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये कृषी प्रती जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमात कृषीदूतांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक शंकांचे समाधान केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सतिशकुमार भोसले सर व शिक्षक बथुवेल हिवाळे सर यांच्याकडून ‘कृषी हीच खरी समृद्धीची वाट’ हे संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. शाळेचे शिक्षक व ग्रामस्थांनी कृषीदुतांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागात कृषी शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, असे मत व्यक्त केले.