बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी युवा नेते आदिनाथ ठोंबरे यांच्या आग्रहाखातर शाळेच्या दोन वर्ग खोल्या मंजूर केल्या होत्या. त्या खोल्याचे काम पूर्ण झाल्याने सुजय विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम माजी खासदार सुजय विखे पाटील यांची गावातून ढोल ताशांचा गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या नूतन खोल्यांची रिबीन कापून लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर हनुमान मंदिर सभामंडपात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव कारभारी ठोंबरे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते आदिनाथ ठोंबरे यांनी केले. आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी सुजय विखे पाटील बोलतांना म्हणाले की, कार्यकर्ता आदिनाथसारखा हाडाचा असावा, ज्यांनी पाठपुरावा करून या खोल्यांची कामे मंजूर करून घेतली. मी या मतदारसंघाचा खासदार नसूनही हे काम फक्त कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर करावं लागलं.
भविष्यात तुमच्या गावातील कोणतेही काम सांगा मी करेल, असे आश्वासनही विखे पाटील यांनी दिले. या कार्यक्रमाप्रसंगी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्तार अधिकारी केदार मॅडम, बालाजी देडगावचे पोपटराव बनसोडे, युवा नेते उमेश हंडाळ, दादा भिसे, खंडेश्वर वाघमोडे, शंकर कोकरे, मनाजी कोकरे मुकादम, बबनभाई सय्यद, अविनाश वाघमोडे, शहाजी पठारे, नाथा माने, आजिनाथ भाऊसाहेब होंडे, नवनाथ होंडे, शंकर वाघमोडे, शहादेव होंडे, संभाजी होंडे, संदीप जमादार, अशोक ठोंबरे, गणेश शिंगटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मरकड सर व सर्व शिक्षक वृंद व पाचुंदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
