बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर सलग्न स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालय, निमगाव वाघा (ता.नगर) यांच्या वतीने देण्यात येणारा जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा संगीत अलंकार पुरस्कार 2025 नेवासा तालुक्यातील माका येथील राहुल शिवाजीराव पालवे यांना जाहीर करण्यात आला आहे. राहुल पालवे यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराचे जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज मराठी साहित्य संमेलनात संमेलनांच्या अध्यक्षांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी वितरण करण्यात येईल, असे पुरस्कार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
