गोयकर वस्ती येथे मंगळवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थान, गोयकर वस्ती (गारमाथा) येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, वै. हभप बन्सी महाराज तांबे यांचे आशिर्वादाने व गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हभप सुखदेव महाराज मुंगसे व हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली व शुभहस्ते धर्म ध्वजारोहणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट ते शनिवार दिनांक ९ ऑगस्ट या कालावधीमध्ये या  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ६.३० श्रींची आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११ ते ३ भोजन व विश्रांती, दुपारी ३ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ६.३० श्रींची आरती व नंतर ७ ते ९ कीर्तन सोहळा व तदनंतर महाप्रसाद व नंतर हरिजागर अशा दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूक होईल. या कीर्तन महोत्सवामध्ये मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी हभप सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), बुधवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी हभप सूर्यभान महाराज (वाघोली) गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी हभप आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड), शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी हभप प्रदीप महाराज वाघमोडे (पाचुंदा) यांचे हरिकीर्तन होणार आहे. तर शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ हभप सुरेशानंद महाराज शास्त्री (शृंगऋषिगड) यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर समस्त गोयकर वस्ती यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत होईल. या सोहळ्यासाठी प्रमुख म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , मा. शारदाताई पांढरे, मा. अण्णासाहेब बाचकर राहुरी, महादेव मंदिर देवस्थान समिती देडगाव, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, हभप एकनाथ महाराज वाघमोडे, हभप बोंद्रे महाराज, हभप तुकाराम महाराज सानप, विनायक ससाने, बाळासाहेब कोकरे, नवनाथ आचपळे, हभप ज्ञानेश्वर महाराज होंडे, हभप पांडुरंग महाराज रक्ताटे, निलेश म्हातारदेव कोकरे, मच्छिंद्र देवराव मुंगसे ,अनिल करांडे पाचुंदा यांची प्रमुख उपस्थिती व विशेष सहकार्य लाभणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, बालाजी देडगाव भजनी मंडळ व पाचुंदा भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. तरी या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गोयकर परिवार, चोपडे परिवार, काळे परिवार, देवकाते परिवार व होंडे परिवार यांनी केला आहे.