जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील श्रीरामपूर येथील रिमांड होम येथे शिक्षण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सहस्नेह मेळावा नेवासा तालुक्यातील विद्यार्थी सखाहरी कोरडे यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी १९८५ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सस्नेहमेळ्याच्या निमित्ताने रिमांड होम येथे गरजू विद्यार्थ्यांना मायेची उब म्हणून ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच मिस्टअन्न भोजनाचाही त्यांना आस्वाद दिला गेला.
या कार्यक्रमाचे आयोजन नेवासा तालुक्यातील खेडले काजळी येथील रहिवासी व श्रीरामपूर रिमांड होम येथील माजी विद्यार्थी सखाहरी कोरडे यांनी केले होते.
सखाहरी कोरडे दरवर्षीप्रमाणे सस्नेह मेळाव्याचे आयोजन करत असतात. मागील वर्षी त्यांनी हा स्नेह मेळावा शेवगाव तालुका येथे आयोजित केला होता. यावर्षी त्यांनी श्रीरामपूर येथील रिमांड होम मधील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या वर्षीचा सस्नेह मेळावा श्रीरामपूर येथील रिमांडहोम येथे घेण्याचे ठरवले.
त्यांच्या या संकल्पनेला साथ देत रिमांड होम मधील वर्ग मित्रांनी एकत्रित येत हा सस्नेह मेळावा उत्कृष्टपणे संपन्न केला व जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी रिमांड होम मधील घालवला व जुन्या आठवणींना उजळा देत आठवणी ताज्या केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलथे सर होते. तसेच हा कार्यक्रम रीमांड होमचे माजी शिक्षक आगळे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला गेला होता.
याप्रसंगी रिमांड होमचे माजी शिक्षक आगळे सर बोलतांना म्हणाले की, सखाहरी कोरडे यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकमेकांना भेटण्याची व बोलण्याची संधी मिळाली हे सर्व श्रेय सखाहरी कोरडे यांना जाते. सखाहरी कोरडे दरवर्षीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचे काम करतात हे काम हे त्यांचे पुण्याचे काम असून जुन्या आठवणींना उजाळा देत आम्हालाही तुम्हा विद्यार्थ्यांना पाहून जगण्यासाठी नव ऊर्जा मिळते उतार वयामध्ये जुन्या विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर नवचैतन्य व जुन्या आठवणींना उजळा आम्हाला मिळतो आम्हाला नेहमी वाटते की विद्यार्थी हा मोठा होत राहो आपण सर्वही नेहमी उज्वल भविष्य आपले असावे व आपल्याला दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आगळे सरांनी बोलताना केली. आपण सर्व विद्यार्थी हे मोठे मोठे उच्च पदावरती असल्याचे पाहून माझे मन भरून आलेले आहे तसेच मी दिलेली शिकवण आपण सर्वांनी जोपासली यातच माझी शिक्षकी पेशाचे सार्थक झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभ आशीर्वाद त्यांनी दिले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलथे सर होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आगळे सर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाऊसाहेब सोलाट, सूत्रसंचालन बाबासाहेब खराडे यांनी केले. तसेच सखाहरी कोरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले.
यावेळेस सखाहरी कोरडे, वाल्मीक कोरडे, रंगनाथ घारे ,गोरख भगत, बाबासाहेब खराडे, लक्ष्मण बनकर ,सुरेश साळुंके,धर्मा खरात, नानासाहेब अहिरे ,प्रकाश थोरात ,भाऊसाहेब सोलाट, मारुती थोरात ,नानासाहेब चेडे ,शंकर सोनवणे ,अशोक दुधाडे, केशव दुधाडे, परमेश्वर खराडे, प्रभाकर जाटे ,राजेंद्र विखे ,गंगाधर चोळके ,प्रभाकर त्रिभुवन, नंदू गोसावी, नानासाहेब शिंदे, दत्तात्रय काळे ,लाला भाई सय्यद ,इस्माईल भाई शेख, बाबासाहेब जरंगे, माणिक खरात, रामकिसन थोरात आदी उपस्थित होते.
