बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील युवा नेते आकाश चेडे यांची भाजपच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी नेवासा उत्तर मंडलाची कार्यकारिणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, आमदार विठ्ठलभाऊ लंघे साहेब, भाजप जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर या सर्वांच्या सूचनेनुसार भाजप नेवासा दक्षिण विभाग मंडलाध्यक्ष प्रताप चिंधे, संभाजी राजे जगताप यांनी आकाश चेडे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल आकाश चेडे यांचा बालाजी देडगाव येथे विविध संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, व्हा. चेअरमन जनाभाऊ देशमुख, अशोक मुंगसे, सारंगधर मुंगसे,
ग्रामपंचायत सदस्य शरद तांबे, खंडेश्वर कोकरे, सोपान मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पावन गणपती देवस्थानचे अशोक मुंगसे, भिमराज मुंगसे, बारकू पळसकर, दिनकर म्हस्के, अरुण वांढेकर, हरीभाऊ देशमुख,
बंडू महाराज मुंगसे, गोकुळ वांढेकर, अर्जुन पटेकर, शिवाजी मुंगसे, पत्रकार इन्नुस पठाण, विठ्ठल काळे, आदिनाथ टकले, भाऊसाहेब मुंगसे, विश्वास हिवाळे, शुभम दिक्षीत, पांडूभाऊ तांबे आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल आकाश चेडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
