बालाजी देडगाव येथे ऊस उत्पादक शेतकरी परिसंवाद मेळाव्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) : भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेञातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाची उत्पादकत्ता वाढविण्यासाठी जैविक – सेंद्रिय आणि रासायनिक घटकांचा वापर तसेच
ए.आय तंत्रज्ञान व इतर अनुषंगिक माहिती देण्यासंदर्भात शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ :३० ते १२:३० या वेळेत बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात शेतकरी परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या मेळाव्यात सांगली येथील प्रख्यात शास्त्रज्ञ व ऊस विशेष तज्ञ सुरेश माने हे उपस्थितीत राहून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी केले आहे.
या मेळाव्यास कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील,जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक शेवगांव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितीज घुले पाटील,व्हा.चेअरमन माजी आमदार पांडूरंग अभंग व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी परिसंवाद मेळाव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पीकाबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.