जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक 30.11.2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे. राज्य सरकारनं यापूर्वी 01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती.
मात्र, मोठ्या संख्येनं वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नव्हती. आता मुदत संपण्यास एका दिवसाचा कालावधी बाकी असतानाच राज्य सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना राज्य सरकारनं दिलेल्या मुदतवाढीच्या काळात एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावा लागतील. आता 30 नोव्हेंबर पर्यंत या नंबरप्लेट बसवून घ्यावी लागणार आहेत.
महाराष्ट्र शासनानं एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ जवळपास साडे तीन महिन्यांची आहे. तोपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. 30 नोव्हेंबरपर्यंत जे वाहनधारक अशी अपॉइंटमेंट घेतील. त्यांना सोडून जे वाहनधारक नंबर प्लेट बसवणार नाहीत किंवा अपॉइंटमेंट घेणार नाहीत त्यांच्यावर 1 डिसेंबरपासून कारवाई केली जाणार आहे.