चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरात नांगरे परिवाराच्या हस्ते महाअभिषेकाचे आयोजन 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्रसिध्द अशा महादेव मंदिर येथे सोमवारी (दि.१८) चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त नांगरे परिवाराच्या वतीने महाअभिषेक व आरती करण्यात येणार आहे. तसेच यावेळी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या काळामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणही होणार आहे. येथील महादेव मंदिर येथे कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक तबला विशारद प्रा. संदिप नांगरे सर व सौ. सुलभा संदिप नांगरे या दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक व आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविकांना खिचडी वाटप करण्यात येणार आहे आले. तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन नांगरे परिवार व कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.