बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांबद्दल कृतज्ञता, शाळेतील शिक्षकांना निरोप व नवीन शिक्षकांचे स्वागत समारंभ म्हणून हनुमाननगर शाळा व शालेय समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सध्याचे गतिमान आणि स्पर्धेचे युग असल्याने शाळेच्या भौतिक व सर्वांगीण सुविधा मध्ये हनुमाननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शाळेतील विद्यार्थी मागे राहु नये, शालेय व्यवस्थापन शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व पालक यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कडे विविध कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, ही मागणी केली आणि त्याला दुजोरा देत ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य यांनी पुढीलप्रमाणे हनुमाननगर शाळेसाठी मागील साडेचार वर्षात विकासकामे पुर्ण केली.
१)शाळा खोल्या राळेघोटाई, २)LCD,
३)पेव्हिंग ब्लॉक,
४)मागील बाजूस कंपाऊंड
५) सार्वजनिक सुलभ शौचालय
६) चार प्रकारचे व्यायामाचे साहित्य
७) हनुमाननगर परिसर व दलित बांधवांसाठी खडीकरण १० लक्ष रुपये. याप्रमाणे आजपर्यंत झालेल्या साडेचार वर्षात भरीव निधी हनुमाननगर शाळेसाठी मिळाल्याबद्दल उपस्थित शालेय समिती, मान्यवर, व पालक, व हनुमाननगर मित्र मंडळ यांनी ग्रामपंचायतचे आभार मानुन कृतज्ञता म्हणून सन्मान केला. तसेच यावेळी हनुमाननगर शाळेतून बदली झालेले शिक्षक श्रीमती शेंडगे-हंडाळ मॅडम, आणि श्री रविराज चौरे सर, यांना निरोप देऊन त्यांनी शाळेचा व विद्यार्थ्यांंचा दर्जा व गुणवत्ता वाढली पाहिजे म्हणून उत्तम कामगिरी व मेहनत घेतली त्याबद्दल आठवणी सांगितल्या व नव्याने आलेले अनुभवी शिक्षक श्रीमान श्री लोंढे सर, आणि श्री लांघे सर यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ज्याप्रमाणे चौरे सर व शेंडगे मॅडम यांनी ज्याप्रमाणे मुले घडविले, त्याचप्रमाणे नवीन आलेले शिक्षक देखील अनुभवी असुन शाळेच्या यशात प्रत्येक शिक्षकांचा असलेला वाटा अधोरेखित करत नवीन शिक्षकही त्याच परंपरेला पुढे नेण्याचे शंभर टक्के प्रयत्न करतील कुठलीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही दिली.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सतिशराव काळे पाटील, उपसरपंच शरद पा काळे, प्रगतशील शेतकरी रेवन्नाथ पा काळे, मा. सरपंच बालकनाथ पा काळे, मा. सरपंच सुरेश पा काळे, मा उपसरपंच अशोक काळे, मा.उपसरपंच एकनाथ घोडेचोर, ग्रामविकास अधिकारी काळे बी.बी. भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य महेश गटकळ, प्रगतशील शेतकरी साईनाथराव काळे, बाबासाहेब काळे सर, मा.चेअरमन ज्ञानेश्वर काळे, दत्तात्रय काळे मा.ग्रामपंचायत सदस्य, सोपान गटकळ, प्रा.मधुकर घाडगे सर, शेंडगे सर, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण काळे, उपाध्यक्ष शंकर गायकवाड, मच्छिंद्र घोडेचोर, ज्ञानदेव काळे, गोवर्धन काळे, दीपक काळे, दीपक घाडगे, राहुल काळे, पांडुरंग वाकचौरे, देविदास गायकवाड, कोकरे संतोष,शिंगटे संतोष, लिपने सोमनाथ, साप्ते भावराव, राम काळे, संदीप काळे, गणेश भांडवलकर, बंडू काळे, सोपानराव शेंडगे, विजय गायकवाड, प्रगतशील शेतकरी निवृत्ती पा गटकळ, राजेंद्र गटकळ, विजय काळे, बबन जाधव, नाना कावळे, सुनिल सरोदे,नवघरे, सरोदे सुरेश, अशोक शिंगटे, सरोदे बाळासाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षकांसह, कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवन्नाथ काळे, सुरेश काळे साहेब, शरदराव काळे, सतिशराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी हनुमाननगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शालेय व्यवस्थापन शिक्षण समिती व हनुमाननगर मित्र मंडळाने मेहनत घेत छान नियोजन व आयोजन केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसह सर्वांना अल्पोआहार दिला.
