तेलकुडगाव येथील काळे वस्ती शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप तर नव्याने आलेल्या शिक्षकांचे उत्साहात स्वागत

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील
तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती शाळेतील श्रीमती छजलाने मॅडम यांना निरोप व नवीन शिक्षक गर्जे सर यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
हनुमाननगर शाळेतून बदली झालेल्या शिक्षिका श्रीमती छजलाने सुमित्रा मॅडम यांना निरोप देऊन आणि नव्याने रुजू झालेले अनुभवी शिक्षक गर्जे संजय सर यांचा सन्मान शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व पालक, मान्यवर केला. तसेच अनुभवी व विद्यार्थ्यांना घडविण्याची ओढ असणारे मरकड सर व नव्याने रुजू झालेले गर्जे सर हे निश्चित स्वरूपात शाळेतील विद्यार्थ्यांंची गुणवत्ता व दर्जा वाढली पाहिजे म्हणून उत्तम कामगिरी करून मेहनत घेतील त्याबद्दल शंका नाही, अशी भावना व्यक्त केली.
या सत्कार समारंभानंतर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिलीप गटकळ यांनी सर्व शालेय शिक्षण समितीच्या व पालकांच्या वतीने ग्रामपंचायतकडे काही प्रमुख मागण्या केल्या.
व तदनंतर तेलकुडगाव चे सरपंच सतीशराव काळे पाटील यांनी आपल्या मनोगतातून तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेसाठी केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. सध्याचे गतिमान आणि स्पर्धेचे युग असल्याने, आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबर शालेय शिक्षणातील विद्यार्थी घडवण्याची कार्य करत असलेल्या अंगणवाडीसह, जिल्हा परिषद शाळा देखील विकासझोतात आल्या पाहिजेत यासाठी जास्तीत जास्त निधी शालेय शिक्षणासाठी कसा खर्च करता येईल याचे तंतोतंत नियोजन केलेले आहे, हा हेतू ठेवून
शाळेसाठी भौतिक व सर्वांगीण सुविधा मिळण्यासाठी आजपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे/म्हस्के वस्ती साठी २०२०-२१ पासून आजपर्यंत सार्वजनिक सुलभ शौचालय, इंटरेक्टीव्ह बोर्ड, सोलर पंप, किचन शेड दुरुस्ती, बाकडे, जवळपास सहा ते सात लाख रुपये तेलकुडगांव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आतापर्यंत ही शाळेसाठी विकासकामे केली असल्याचे सांगितले व आज पुन्हा शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, इन्व्हर्टर, कॉम्प्युटर, प्रिंटर, या ज्या नवीन मागण्या केलेल्या आहेत, त्यावरती मासिक मीटिंगमध्ये सर्वांशी चर्चा करून जास्तीत जास्त मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.
आजपर्यंत झालेल्या साडेचार वर्षात भरीव निधी आपल्या वस्ती शाळेसाठी दिल्याबद्दल उपस्थित शालेय समिती, मान्यवर, व पालक, शिक्षक यांनी ग्रामपंचायतचे आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सतिशराव काळे, मा.सरपंच बालकनाथ काळे, शालेय समिती अध्यक्ष दिलीप गटकळ, मा अध्यक्ष अमोल काळे, प्रल्हाद म्हस्के, संभाजी म्हस्के, प्रगतशील शेतकरी बबन तात्या म्हस्के, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के, सुदर्शन काळे, महेश गटकळ, अमोल म्हस्के, तुकाराम शेंडगे, बाळासाहेब म्हस्के, मच्छिंद्र शेंडगे, सदीप गटकळ, आबासाहेब गटकळ, दादासाहेब काळे, रायभान म्हस्के, मा.उपसरपंच गोवर्धन काळे, विकास काळे, भारत गटकळ, लक्ष्मण शेंडगे, नवनाथ काळे, सुखदेव दळे, भैय्या शेंडगे, सावळेराम शेंडगे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती, शालेय व्यवस्थापन समिती, अध्यक्ष उपाध्यक्ष, शिक्षक, पालक यांनी मेहनत घेत छान नियोजन व आयोजन केले.