योगेश तांबे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष योगेश तांबे यांची मुलगी नित्या योगेश तांबे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नित्या तांबे हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष विष्णू रघुनाथ तांबे, तसेच युवा कार्यकर्ते प्रशांत तांबे, महेश तांबे, निलेश तांबे, भगवंत तांबे उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष योगेश भाऊ तांबे यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शाळेत येऊन साजरा करण्याचे ठरवले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी नित्याला वाढदिवसाच्या मनापासून भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी उपाध्यक्ष यांच्यातर्फे शाळेतील प्रत्येक मुला-मुलींना वही व पेनाचे वाटप करण्यात आले. कुमारी नित्या हिस शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून बुके तयार केले होते त्या मुलींचे सुद्धा उपस्थित आमच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांगरे सर यांनी केले तर कचरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.