माका महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा दिनाचे औचित्य साधून सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे काम उत्कृष्टरित्या पार पाडले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. दत्ता कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते. तसेच त्यांनी विद्यार्थ्याने आपल्या घरासमोर किमान तीन वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे असे अवाहन केले. तसेच महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. निखिल निपुंगे यांनी केले. तर अध्यक्षीय सूचना प्रा. प्राजक्ता गायके यांनी मांडली, तर अनुमोदन प्रा. शाहबाज सय्यद यांनी दिले. सूत्रसंचालन अश्विनी बोरूडे हिने केले. तसेच आभार प्रा. मंदार कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा. निखिल निपुंगे, प्रा. अमोल दरंदले, प्रा. प्राजक्ता गायके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सेवक उपस्थित होते.