बालाजी यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची धर्मध्वजारोहणाने उत्साहात सुरुवात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे वै. श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा, वै. बन्सी महाराज तांबे यांच्या आशिर्वादाने व हभप गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व हभप स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली बालाजी यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन धर्मध्वजारोहणने करण्यात आली. या सप्ताहनिमित्ताने गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. सोमवार दि. २९ सप्टेंबर ते सोमवार दि.६ ऑक्टोबर या कालावधित या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या धर्मध्वजारोहण प्रसंगी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, उपाध्यक्ष सुभाषशेठ चोपडा, विश्वस्त अशोकशेठ गांधी, देवस्थानचे विश्वस्त रामानंद मुंगसे, कुंडलिक दादा कदम, हभप सुखदेव महाराज मुंगसे, सैदू महाराज पुंड, देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कैलासनाथ मित्र मंडळाचे राजू कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ कुटे, देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था, सचिव रामानंद मुंगसे, सतीश मुथ्था, चेअरमन सागर बनसोडे, चांगदेव तांबे, संभाजी काजळे, रामदेवा तांदळे, बाळासाहेब चोपडा, सुभाष मुंगसे, भिमराज मुंगसे, विलास मुंगसे, मधू क्षिरसागर, राजू देवा तांदळे आदी ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
या सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ६.३० श्रींची आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते ३ भोजन, विश्रांती, ३ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, ६.२० श्रींची आरती व रात्री ७ ते ९ हरिकिर्तन नंतर महाप्रसाद व नंतर हरिजागर या दैनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह काळात हभप महंत भागवताचार्य सुदर्शनमुनी महाराज उदासिन (सुदर्शन आश्रम शिंदेवाडी), ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज शिंदे (शांतिनिकेतन आश्रम), ह.भ.प. महंत आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड), ह.भ.प. गाथामुर्ती सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज येळीकर (येळेश्वर संस्थान येळी), ह.भ.प. सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव आश्रम, बऱ्हाणपूर), ह.भ.प.महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड) यांची किर्तनसेवा होणार आहे. तर सोमवार दि.०६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के (श्री क्षेत्र नेवासा संस्थान) यांचे काल्याचे किर्तन होईल. तरी या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वयंभु बालाजी देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव यांनी केले आहे.