बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र रेणुकामाता जागृत देवस्थान नवरात्र उत्सवात फुगडी व दांडियाचा आनंद लुटला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.
चार भिंतीच्या बाहेर सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांना चांगलाच आवडला. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे, ग्रामपंचायत सदस्या उषाताई गायकवाड, उपाध्यक्ष आजीनाथ वांढेकर, कृषी अधिकारी संजय कदम, प्रा. जालिंदर कदम, बाबासाहेब मुंगसे, नितीन कदम, विलास म्हस्के, रघुनाथ कुटे, अर्जुन नजन, गणेश कुटे, संजय मुंगसे, अविनाश दळवी तसेच सुभद्रा कदम, सुवर्णा कदम, सिंधुबाई कदम, शोभा कदम,
जयश्री कदम, मनिषा कदम, परागा कदम, सविता कदम, अनिता कदम,सुनिता मुंगसे, मुंगसे विद्या अंबादास, मुंगसे मंगल संभाजी, मुंगसे सुनीता संदीप, मुंगसे योगिता लक्ष्मण, मुंगसे अनिता सोपान, मुंगसे सुनीता रामनाथ, वांढेकर स्वाती, मुंगसे स्वाती बाळासाहेब, सुनिता कदम,अक्षय तांबे,लता ताके,हौसाबाई ताके,अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे,मदतनीस राधिका मुंगसे यांचे व पालकांचे सहकार्य लाभले.
तसेच देवस्थानचे मुख्य पुजारी जगन्नाथ शेटे यांनी देवीचे महत्व, इतिहास, नवरात्रौत्सव याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना यावेळी सुंदर असा फराळ देण्यात आला. शाळेच्या विविध उपक्रमाला नेवासा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्ताराधिकारी मिरा केदार, केंद्रप्रमुख कमल लाटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. उपक्रमाला संयोजन मुख्याध्यापिका वनिता चिलका यांचे तर नृत्य सराव सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी घेतला.