बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात विजयदशमी व दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर कैलासनाथ मित्र मंडळ व कैलासनाथ स्वयंसहायता बचत गट देडगाव यांच्या संकल्पनेतून सुवर्ण वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. हस्तरेषा तज्ञ कनकमलजी मुथ्था यांच्या प्रेरणेने व कैलासनाथ मित्रमंडळाच्या अधिपत्याखाली महादेव मंदिर व परिसरात विविध कामे सुरु आहेत. हभप सुखदेव महाराज मुंगसे व समस्त ग्रामस्थ, बालाजी देडगाव यांच्या शुभहस्ते या सुवर्ण वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ऋषिकेशजी मोटे (तरुण व्यवसायी प्रमुख नेवासा तालुका), डॉ. सुनील सावंत (नेवासा तालुका कार्यवाह) उपस्थित होते. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, कैलासनाथ मित्रमंडळाचे राजू कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, हरिभाऊ देशमुख, शरद जाधव, मधुकर क्षीरसागर, अरुण वांढेकर, नरहरी मुंगसे मेजर, बाळासाहेब मुंगसे, विजय गोयकर, नवनाथ गोयकर, कानिफ गोयकर, चोपडे मामा, विठ्ठल शिरसागर, उद्धव नांगरे, सोपान मुंगसे, महेश वांढेकर, गणेश मुंगसे, संदीप मुंगसे, लहू वांढेकर, शरद जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देडगावचे सदस्य आदी उपस्थित होते.
