बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांनी बालाजी देडगाव येथे सदिच्छा भेट देत बालाजी यात्रेनिमित्त श्री बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी श्री बालाजी देवस्थान ट्रस्ट व श्री बालाजी यात्रा कमिटी यांच्यावतीने आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर विठ्ठलरावजी लंघे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी देडगाव ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठलरावजी लंघे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर विठ्ठलराव लंघे पाटील यांनी संत रोहिदास महाराज मंदिरात देवस्थानला सदिच्छा भेट देत संत रोहिदास महाराजांना अभिवादन केले. यावेळी संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर आमदार लंघे पाटील यांनी महादेव मंदिरास भेट देत दर्शन घेतले.
त्यावेळी त्यांचा कैलासनाथ मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची गावातून फटाक्याच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी उपसरपंच महादेव पुंड, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, भाजप तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, शरद शिंदे, विश्वस्त सुनील मुथ्था, विश्वस्त सुभाष मुंगसे, विश्वस्त बाळासाहेब मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य पोपट मुंगसे, भाजप नेते शरद शिंदे,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, किशोर मुंगसे, गणेश औटी, गोकुळ वांढेकर, वसंत कदम, मधुकर क्षीरसागर, रघुनाथ कुटे, युवा नेते उद्धव मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे, युवा नेते सोपानराव शेंडगे, साहेबराव मामा कदम, वसंत कदम, कैलासनाथ मित्रमंडळाचे राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, मेजर नरेश देशमुख, कानिफ गोयकर, बबन तात्या मुंगसे,
ओंकार तांबे, पिनू काळे, बंडू मुंगसे, मधुकर क्षीरसागर, पत्रकार इंनुस पठाण, बलभीम सकट, संकेत मुंगसे, बंडू मुंगसे, रामदास एडके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.