बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन व आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी विद्यार्थ्यांबरोबर हरिभाऊ गुणाजी मुंगसे, भिमाबाई ठकाजी मुंगसे, लताबाई मोहन ताके,जिजाबाई नामदेव कदम,अलका अशोक कदम,अनिता जगन्नाथ शेटे, उषाताई एकनाथ ताके,प्रतिक्षा प्रदिप कदम,राधिका पंडित मुंगसे या पालक व आजी आजोबांनीही वाचन व आकाशकंदील कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक आकाशकंदील बनवत कलेचा आनंद लुटला. पालक,आजी आजोबा यांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले. पालकांनी शाळेतील विविध उपक्रम,विद्यार्थी गुणवत्ता,शालेय कामकाज यावर समाधान व्यक्त करुन कौतुक केले.
अभिषेक घटमाळ सरांनी कार्यशाळेनिमित्त विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषाशैलीत मार्गदर्शन केले.शाळेतील विविध उपक्रमांना गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्ताराधिकारी मिरा केदार,केंद्रप्रमुख कमल लाटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. उपक्रमाला सहकार्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी तर संयोजन मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी केले.आभार सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी मानले.