बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथील द्वितीय वर्षाच्या विज्ञान शाखेतील आदित्य नानासाहेब गावडे व नितीन रंगनाथ दहिफळे हे दोन विद्यार्थी नुकतेच आर्मीत भर्ती झाले आहेत. त्यांना माका महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख पाटील, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी अभिनंदन केले.

