जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली व आय.एस.ओ मानांकन प्राप्त असलेली तालुक्यातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा चाइल्ड करियर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध उद्योगांना अभ्यास भेटी देऊन क्षेत्रभेट उपक्रम घेण्यात आला.
शाळेच्या परिसरातील गेवराई येथील गुळ निर्मिती प्रकल्पास क्षेत्र भेट देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.विद्यार्थ्यांना उसाच्या रसापासून गुळ निर्मिती कशी केली जाते .हे विस्तृतपणे सांगितले व गुळ निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्षात दाखवली. उसाचा रस मशिनरीच्या सहाय्याने कसा काढला जातो, नंतर तो उकळला जातो , ऊसाच्या रसापासून ते गुळ तयार होण्यापर्यंतची संपूर्ण प्रकिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. व ही सर्व प्रक्रिया विद्यार्थी बारकाईने व काळजीपूर्वक बघत होते.
संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रा.श्री सागर बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच व्यवहारीक ज्ञान, उत्पादन प्रक्रियेची माहिती, व तांत्रिक ज्ञान मिळते याचा उपयोग विद्यार्थ्यांनी भविष्यात करून घ्यावा. असे प्रतिपादन केले.
प्राचार्य श्री. रवींद्र गावडे सर यांनी उसाचे उत्पादन व त्याच्या अंतिम प्रक्रियेची माहिती व तसेच नवीन तंत्रज्ञान व मशनरी कशा वापरल्या जातात .ही विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी ही क्षेत्रभेट आयोजित केले असल्याची माहिती दिली.

