जनशक्ती (वृत्तसेवा)- आपण एक संधी द्या, आपल्या भागाचा विकास करून चित्र बदलून टाकू, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केले. कुकाणा येथील साई श्रद्धा लॉन्स येथे अब्दुल भैय्या शेख यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य नोकरी मेळावा, शासकीय योजनेचा मेळावा तसेच आरोग्य कार्ड वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष अशोकजी मोरे, कुकाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच लताताई अभंग, युवा नेते अमोलजी अभंग, बाबासाहेब नवथर, आबासाहेब गर्जे, गोविंद सर आदी मान्यवर उपस्थित होते. नोकरी मेळाव्यासाठी देशातील नामांकित कंपन्या व त्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते. परिसरातील सर्वसामान्य नागरिक, युवक–युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला. अनेक युवक–युवतींना तात्काळ रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान अब्दुल भैय्या शेख यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
महिलांनीही मनमोकळेपणाने आपली मते व अपेक्षा व्यक्त केल्या. त्याच बरोबर येणाऱ्या काळात भैय्या बरोबर एक मताने उभा राहू अशी शपथ घेत भैय्याच्या सामाजिक कार्याची दखल देखील घेतली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल भैय्या सामाजिक प्रतिष्ठान आणि तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांचे विशेष योगदान लाभले. समाजहिताच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले. या मेळाव्याचे नियोजन तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांनी केले.

