बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे वसंत बडे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून मुळा सहकारी बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, संस्थेचे संस्थापक सागर बनसोडे, सुखदेव पाटील होंडे ,संस्थेच्या संचालिका मीना बनसोडे पालक नवनाथ सोलाट, साहेबराव जाधव, नवनाथ पंडित, राजेंद्र सांगळे, पप्पू शिंदे आदी उपस्थित होते.
संविधान म्हणजे मूलभूत कायदे आणि नियमांचा संग्रह आहे. ज्याच्या आधारे देत चालतो. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तर भारतीय संविधाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक सागर बनसोडे यांनी केले. दरम्यान वसंत बडे , माणिकराव होंडे, नवनाथ सोलाट यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उषा गीते , शुभांगी सानप ,जयश्री जगताप, जयश्री पटेकर , रिना भालेराव वैशाली आव्हाड , चंदा शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

