बालाजी देडगाव येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. त्यानंतर उपस्थित महिला मंडळाच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढून दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अरुण शंकर बनसोडे व समस्त ग्रामस्थ बालाजी देडगाव यांच्या वतीने महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बालाजी देडगाव, दत्त मंदिर ट्रस्ट उत्सव समिती व कैलासनाथ मित्र मंडळ बालाजी देडगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बजरंग दल श्री क्षेत्र बालाजी देवस्थान ट्रस्ट, श्री खंडोबा देवस्थान व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ बालाजी देडगाव यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्धव नांगरे, सोपान मुंगसे, अरुण वांढेकर, राजू कदम, गणेश मुंगसे, महेश वांढेकर, संदीप मुंगसे, संदीप नांगरे, दिलीप तांदळे, दीपक लाड, शुभम दीक्षित, अस्लम पठाण, गणेश मुंगसे, शुभम तिडके, पापाबाई पठाण, भैय्या तिडके यांनी विशेष परिश्रम घेतले.