बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव शाखेत श्री संत नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या हस्ते नागेबाबा प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रस्ताविक एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या विविध योजना, डिजिटल बँकिंग सुविधा, सोनेतारण सुविधा, गोशाळा अन्नपूर्णा योजना व संस्थेची आर्थिक परिस्थिती सभासदासमोर मांडली.
याप्रसंगी पावन गणपती देवस्थानचे अशोक मुंगसे यांनी आपले मनोगतातून संस्थेच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच हभप सुखदेव महाराज मुंगसे यांनी संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, व्यावसायिक संघटनेचे किशोर मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, किशोर कदम, विश्वास हिवाळे, दत्तात्रय कदम, पत्रकार इनुस पठाण, राजेंद्र अंबाडे, संजय मुंगसे, चेअरमन सागर बनसोडे सर, दत्तात्रय तिडके, सागर पगारे, ज्ञानदेव मुंगसे, गोरक्षनाथ रक्ताटे, राजेंद्र ससाने, हरिभाऊ गोयकर, राजेंद्र गायकवाड, ज्ञानदेव मुंगसे, भागवत दीक्षित, बन्सी कुलट, बन्सी मुंगसे, बन्सी पळसकर, पोपट बनसोडे, शहादेव मुंगसे, अरुण वांढेकर, राजेश वाघ, विठ्ठल घोडके, अंगणवाडी सेविका भिमाबाई शेळके, सभासद, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा समन्वयक सचिन जाज्यू, क्लार्क योगेश भारती, राहुल मुंगसे, कॅशियर अक्षय तिडके, शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.



