जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपकरणास तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगाव येथे झालेल्या पंचायत समिती नेवासा तालुका व गणित-विज्ञान अध्यापक संघ आयोजित 53 व्या गणित-विज्ञान भव्य तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये इयत्ता 6 ते 8 वी विज्ञान या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
वेस्टिंग मॅनेजमेंट हे उपकरण उत्कृष्टरित्या गौरी प्रसाद गायकवाड, सोहम अजिंक्य विधाटे व यश सोमनाथ गोरे या विद्यार्थिनी सादर केले. या उपकरणाच्या माध्यमातून टाकाऊ पदार्थापासून बायोगॅस व इलेक्ट्रिसिटी ,सेंद्रिय खत निर्मिती कसे तयार केले जाते हे उपकरण सादर केले. याची तालुका स्तरातून जिल्हा स्तरावर निवड झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या व प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक इसाक शाह सर यांचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे सर, प्राचार्य रवींद्र गावडे सर, विश्वस्त अंबादास गोरे, मनोहर बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्ष ,ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.



