तेलकुडगाव येथील नागनाथचरणी आज चांदीचे सिंहासन अर्पण होणार

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री चैतन्य नागनाथ महाराज यांच्या चरणी आज साडेचार किलो चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात येणार आहे.
तेलकुडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कचरू मोहन गायकवाड यांनी नागनाथ चरणी साडेतीन किलो चांदी अर्पण केली होती. त्यांची साडेतीन किलो चांदी आणि नागनाथ देवस्थानची एक किलो चांदी असे दोन्ही मिळून साडेचार किलो चांदीचे सिंहासन तयार करण्यात आले आहे. हे सिंहासन आज श्री चैतन्य नागनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. या सिंहासनाचे डिझाईन हे मानूरकर ज्वेलर्स कुकाणा यांनी बनवले आहे. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक,भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत गटकळ, नागनाथ देवस्थानचे सचिव मेजर अर्जुन गायकवाड यांनी केले आहे.