बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री चैतन्य नागनाथ महाराज यांच्या चरणी आज साडेचार किलो चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात आले. तेलकुडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कचरू मोहन गायकवाड यांनी नागनाथ चरणी साडेतीन किलो चांदी अर्पण केली होती. त्यांची साडेतीन किलो चांदी आणि नागनाथ देवस्थानची एक किलो चांदी असे दोन्ही मिळून साडेचार किलो चांदीचे सिंहासन तयार करण्यात आले आहे. हे सिंहासन आज श्री चैतन्य नागनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
या सिंहासनाचे डिझाईन हे मानूरकर ज्वेलर्स कुकाणा यांनी बनवले आहे. यावेळी सरपंच सतीशराव काळे, उपसरपंच शरदराव काळे, बालकनाथ काळे, माजी सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर, पोलीस पाटील शिवाजीराव घोडेचोर, अमोल महाराज घाडगे, नवनाथ महाराज घाडगे, श्रीधर महाराज घाडगे, मच्छिंद्र म्हस्के, शिवसेना नेवासा तालुकाप्रमुख चंद्रकांत म्हस्के, चेअरमन नामदेव घोडेचोर, काकासाहेब काळे, घाडगे सर, दीपक काळे, बाळासाहेब काळे, संजय घोडेचोर, गणेश गायकवाड, कुशिनाथ गायकवाड, बाळासाहेब गुगळे, देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत गटकळ, सचिव मेजर अर्जुन गायकवाड, गावातील सर्व भजनी मंडळ, महाराज मंडळी, गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, नितीन मानूरकर ज्वेलर्स, सर्व आजी-माजी सदस्य उपस्थित होते.



