एमपीएससी परीक्षेत यश मिळवणारे तुषार वाघमारे यांचा भव्य नागरी सत्कार

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२४ मधून Inspecting Officer (Supply Department) राजपत्रित अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तुषार अण्णासाहेब वाघमारे यांचा निंबेनांदूर जानापूर पाचुंदा रोड येथील श्री संत सेना महाराज मंदिर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री संत सेना महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा येथील हभप सचिन महाराज पवार यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नाभिक संघटनेचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाळासाहेब वखरे, निंबेनांदूर सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब चेके, पांडुरंग पुंडे, उपसरपंच श्यामराव चेके, भागुजी मामा खोसे, सोमनाथ बडे, प्रभाकर बुधवंत, पोलीस पाटील बबनराव बुधवंत, अण्णासाहेब खोसे, माका गावचे सरपंच अनिलदादा घुले, पाचुंदा सोसायटीचे चेअरमन भरतराव होंडे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, सोसायटीचे सचिव भाऊसाहेब होंडे, बाबासाहेब होंडे, हभप सोपान महाराज होंडे, प्राचार्य स्वरुपचंद गायकवाड सर, भानुदास म्हस्के, संजय गाडे, रघुनाथ पागिरे, अंबादास म्हस्के साहेब, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, डॉ. सुभाष भागवत, भेंडा येथील भागवत सर, दुधाडे परिवार, साकेगाव वाघ परिवार तसेच निंबेनांदूर, पाचुंदा, माका येथील ग्रामस्थ व समस्त वाघमारे परिवाराचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.