बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरशालेय वार्षिक क्रीडा महोत्सव चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाची मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे ,युवा नेते मच्छिंद्रभाऊ लोंढे, प्रशांत थोरात ,मधुकर क्षीरसागर, दिलीपराव लोंढे ,डॉक्टर पालवे, दिगंबर शिंदे, सोमनाथ राऊत, शिमोन पाटेकर, कृष्णा सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान “शीर सलामत तो पगडी पचास” या उक्तीप्रमाणे आपले आरोग्य उत्तम असेल तर आपण जीवनातील कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी खेळ व व्यायाम महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सागर बनसोडे यांनी केले.
यावेळी मच्छिंद्र लोंढे, प्रशांत थोरात ,बाळासाहेब कोकरे, यांनी आपली मनोगतातून स्कूल राबवत असलेल्या विविध विद्यार्थी हिताचे उपक्रमाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालिका श्रीमती. मीना बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संचालक यांनी विशेष परिश्रम घेतले.


