बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तंत्र प्रशिक्षक पंकज विनायक डहाळे यांच्या संपूर्ण आरोग्य प्राप्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील महादेव मंदिर देडगाव येथे मंगळवारी २० जानेवारी पासून रोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या कालावधीमध्ये या संपूर्ण आरोग्य प्राप्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २७ जानेवारी या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसीय आरोग्य शिबीरातून शारिरीक व मानसिक आरोग्य प्राप्ती, शरिर , मन , भावनांची शुद्धता , शरिराच्या जैविक घडाळ्याची सेटींग, शरिराची रिपेरिंग, सर्व्हिसिंग, अलायमेंट नैसर्गिक पद्धतीने करून मिळवा व्याधी मुक्त शरिर, तनाव मुक्त मन असा लाभ मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो पेशंटने हा शिबिराचा लाभ घेतलेला आहे. या शिबिरात मार्गदर्शन करणारे प्रदिर्घ अनुभव असणारे योग प्राकृतिक चिकित्सा तज्ञ पंकज विनायक डहाळे यांनी ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या समस्यांवर, मनक्यांच्या, गुडघे दुखी इ, तनाव व खराब जीवन शैली मुळे होणारे बीपी, डायबिटीस, हदयाचे व्याधी, थायरॉईड, स्थुलता , ॲसिडीटी, बद्धकोष्टता,
महिलांच्या समस्या, नैराश्य, झोपेच्या समस्या अतिविचार इत्यादी त्रासावर व आधुनिक वैदयक शास्त्रांमध्ये पण पूर्ण समाधान नसणाऱ्या आरोग्य समस्यांवर प्रभावी पणे काम करून लोकांना या त्रासांमधून योग प्राकृतिक चिकित्सेच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य प्राप्ती शिबीराची निर्मिती करून प्रभावीपणे लोकांना आरोग्याचा राजमार्ग , १०० वर्ष निरोगी आयुष्य जगण्याची संकल्पना समजावून लोकांमध्ये परिवर्तन घडून आणले. शिबीरामधून शेकडो लोकांचे आरोग्य सुधारले, गोळ्या औषधे यांचा डोस कमी होत गेला, काहींच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या, मनक्यांचे , गुडघ्यांचे ,ऑपरेशन, ॲजोग्राफी , ॲन्जोप्लास्टी टळल्या.
लोकांना तनावमुक्तीचा मार्ग मिळाला.
तरी या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी विठ्ठल क्षिरसागर मो. 9881984371, अरुण वांढेकर मो. 9881960998, मधुकर क्षिरसागर मो. 9423755374, राजेंद्र कदम मो. 9763021481, हरिभाऊ देशमुख मो. 9011732941 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


