चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये”मकर संक्रातीचा उत्सव” हळदी कुंकवाच्या साथीने न्यू होम मिनिस्टर च्या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन.
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारे शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये खास मकर संक्रांतीनिमित्त सलाबतपुर परिसरामध्ये प्रथमच प्रसिद्ध निवेदक गणेश भाऊ हापसे प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर सोबतच “संक्रातीचा वाण आणि पैठणीचा मान”सोबतच भव्य हळदी-कुंकू समारंभ मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमांमध्ये माता पालकांसाठी, हळदी कुंकू,गप्पा गोष्टी चा रंगतदार खेळ मिमिक्री,उखाणे महिलांचे पारंपारिक खेळ. अशा विविध खेळांची धमाल न्यू होम मिनिस्टर च्या कार्यक्रमांमध्ये होणार आहे.
विविध स्पर्धा व विविध बक्षिसे लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य श्री. रवींद्र गावडे यांनी दिली. महिलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, विविध कौशल्याचे प्रदर्शन घडविण्यासाठी आणि मनोरंजनाद्वारे आनंद वाटण्यासाठी हळदीकुंकू निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी दिली.या रंगतदार कार्यक्रमाचा माता पालक व पंचक्रोशीतील माता-भगिनींनी अवश्य लाभ घ्यावा .असे आवाहन प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.