देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, हळदी कुंकू समारंभ उत्साहात

आपला जिल्हा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव पाटील कदम, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युन्नुस पठाण व मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी प्रास्ताविक केले. मनोगतात साहेबराव पाटील कदम, बन्सीभाऊ एडके, युन्नुसभाई पठाण,अमोल कुटे यांनी आपले विचार मांडले.बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टाॅल लावले होते.मान्यवर व पालकांनी स्टाॅलवर खरेदीचा आनंद लुटला.यानंतर महिलांचा हळदी कुंकू समारंभ पार पडला यामध्ये महिलांनी विविध खेळ,वाण वाटप व उखान्याचा आनंद लुटला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले.यावेळी शाळेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्याध्यापिका वनिता चिलका,सहशिक्षक अभिषेक घटमाळ,अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे,मदतनीस राधिका मुंगसे,स्वयंपाकी लताबाई ताके यांचा पालक व मान्यवरांच्याहस्ते जाहीर सन्मान करण्यात आला.
यावेळी गंगाधर कदम,नारायण मुंगसे,अशोक कदम,भानुदास कुटे,कानिफनाथ वांढेकर,गोरक्षनाथ कुटे,बंडू चेमटे,रविंद्र वांढेकर,नागनाथ कोकरे,सागर वाल्हेकर,विष्णू म्हस्के,लक्ष्मण मुंगसे,सोमनाथ मुंगसे, नितीन कदम,विलास म्हस्के, संदीप ताके,अनिल वांढेकर, बाळासाहेब म्हस्के, संभाजी म्हस्के, सोमनाथ ताके,सुभद्राबाई कदम,अनुसयाबाई मुंगसे, मदलासाबाई कदम,लताबाई ताके,जिजाबाई मुंगसे, जिजाबाई कदम,अलका कदम,सुनिता कदम,मनिषा कदम,कविता कदम,सविता कदम,वैष्णवी कदम,वैशाली कदम,अनिता कदम,प्रतिक्षा कदम,पूजा मुंगसे,प्रियंका मुंगसे,श्रद्धा मुंगसे,मयुरी मुंगसे,अर्चना वांढेकर, सोनाली वांढेकर, सुनंदा वाल्हेकर,पूजा वांढेकर, राणी वांढेकर, दिव्या कोकरे,पल्लवी कदम,रोहिणी कदम,पूजा म्हस्के, भक्ती म्हस्के,रुपाली म्हस्के आदी पालक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेला गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर,विस्ताराधिकारी मिरा केदार,केंद्रप्रमुख कमल लाटे, केंद्र मुख्याध्यापक सतिशकुमार भोसले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.या कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.